स्थापना: सप्टेंबर. २०१७
रजि क्र: एम . ए . एच . १२९६/१७
...
...
...

प्रेरणा

महाराष्ट्रामध्ये सातारा पासून ३५ कि. मी. पुढे व कराडच्या अलीकडे १० कि. मी. कृष्णा नदीच्या काठावर श्री पावकेश्वराच्या कृपाआशिर्वादाच्या छत्रछायेखाली निसर्गाने नटलेले गाव म्हणजेच बेलवडे हवेली. हेच गाव आमचे प्रेरणास्थान श्री दादासाहेब पवार ज्यांना भक्त मंडळी प्रेमाने प. पू. दादा महाराज असे म्हणत त्यांच्या पावन चरणाने पुनीत झाले. दादा महाराज म्हणजे ज्ञान मार्ग व भक्ती मार्ग यांचे सर्वोत्तम आचरण करणारी अलौकिक थोर साक्षात्कारी गुरु असे.

प. पू. दादा महाराज यांचा जन्म ४ सप्टेंबर १९६९ रोजी बेलवडे हवेली येथे झाला. जन्मगावी महाराजांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण करत अनेक बाल लीला केल्या अधिक माहिती

नित्यनिरंजनावधूत श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ

(नाम, ध्यान, स्मरण व सेवा मार्ग)
बोरणे - ठोसेघर, सातारा

गुरूंच्या ध्यासाकडे वाटचाल

आज अध्यात्मिक मार्गात होणारी लोकांची फसवणूक पाहता देव म्हणजे काय? भक्ती कशी करावी? यासारख्या अनेक गोष्टी खूप सोप्या पद्धतीने लोकांना समजण्यासाठी "साधना मार्ग" हा लोकांपर्यंत पोहचवून सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात व्हावे हा प.पू. गुरुमाऊली इंगवले महाराज यांचा ध्यास आहे. अध्यात्मिक कार्य मनोभावे, प्रामाणिकपणे करायचे असेल तर दोन गोष्टी लागतात एक म्हणजे गुरुकृपा आणि दुसरं म्हणजे गुरूंचा आदेश. त्यांच्याकडे दोन्ही गोष्टी होत्या. स्वामींची कृपा आणि प.पू. दादा महाराज यांच्या आदेशाच पालन करत त्यांनी गुरूंच्या ध्यासाकडे खूप मोठे पाऊल उचलले आणि नाम, ध्यान, स्मरण, सेवा हा साधा सोपा भक्तीमार्ग अस्तित्वात आणून हे कार्य करण्यासाठी अशी जागा शोधायला सुरुवात केली की ज्याठिकाणी लोकांना आपण या सर्व सेवा मोफत देऊ शकू.

२०१३ साली प.पू. गुरुमाऊली इंगवले महाराज हे काही भक्त सोबत घेऊन कोल्हापूर मधील स्वामींच्या प्रज्ञापूरी मठामध्ये गेले होते. तिथं खूप मोठे स्वामीभक्त प.पू. काटकर महाराज हे भक्तांना मार्गदर्शन करायचे. जेव्हा प.पू. गुरुमाऊली इंगवले महाराज यांनी काटकर महाराजांची अधिक माहिती

दादा महाराज फौंडेशन

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशिर्वादाने, प. पु. दादा महाराज यांच्या प्रेरणेने सप्टेंबर २०१७ मध्ये संस्थापक प.पू. गुरुमाऊली श्री. विजय इंगवले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 'दादा महाराज फौंडेशन' संस्थेची स्थापना करण्यात आली. प. पू. दादा महाराज यांच्या स्वप्नपूर्तीचा ध्यास घेऊन संस्थापक श्री. विजय इंगवले यांनी देशाच्या, धर्माच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी स्थापन केलेली ही संस्था आहे.

"नव्या पर्वाची अखंड सुरूवात" ही सुंदर अशी ओळ या संस्थेची खरी ओळख निर्माण व्हावी म्हणून सर्व कार्यकर्ते एकजूट होऊन काम करत आहेत. अधिक माहिती

विश्वस्त मंडळ

स्वामी सेवेकरी

दादा महाराज फौंडेशन चे मुख्य आधारस्तंभ आहेत ते म्हणजे निस्पृह भावनेने काम करणारे स्वामी सेवेकरी.गुरुमाऊली यांचे मार्गदर्शन सोबतच विश्वस्त मंडळ यांच्या सोबतीने फौंडेशन ने विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी सेवेकरी अखंड आपली सेवा देत असतात. फौंडेशन च्या या सेवा यज्ञात कोणत्याही बंधना शिवाय समाजातील सर्व लहान मोठ्या लोकांचा सहभाग आहे. फौंडेशन मध्ये कार्यरत असणारे सर्व सेवेकरी हे विविध क्षेत्रातील असून काही सेवेकरी हे उच्च विद्याविभूषित असून फौंडेशनच्या जडणघडणीत तसेच भविष्यातील वाटचालीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

सातारा,मुंबई,पुणे,सांगली,कोल्हापूर,सोलापूर अशा विविध जिल्ह्यात दादा महाराज फौंडेशन चे सेवेकरी असून सर्वजण आपआपल्या परीने फौंडेशन च काम पुढे नेत आहेत.

स्वामी साहित्य

गुरुबोल

|| स्वामी ओम ||   || श्री स्वामी समर्थ ||

स्वामी दरबारामध्ये माणूस सेवा करत असतो पण एखादा प्रसंग घडल्यावर जातो का? तर आपल्याला त्यातील सेवेची सूत्र माहित नसतात. सेवेला आल्यावर आपण काय केल पाहिजे, या सुत्रांबाद्द्ल आपल्याला माहिती नसत.ही झाली पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट म्हणजे आपण सेवेला आलोय तर कुणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा ही सूत्र आपण लक्षात घ्यायला हवीत. अधिक माहिती

व्हिडिओ

आध्यत्मिक लेख

|| श्री स्वामी समर्थ ||

गुरुबोल - भक्तीपुष्प 4
गुरुबोल - भक्तीपुष्प ३
गुरुबोल - भक्तीपुष्प २
गुरुबोल - भक्तीपुष्प १
अधिक माहिती

अनुभूती

संपर्क

दादा महाराज फौंडेशन,
स्थापना सेप्ट. २०१७, रजि . क्र . एम . ए . एच . १२९६/१७

सातारा:
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ, बोरणे, ठोसेघर रोड , सातारा.
पुणे :
सर्व्हे. क्र १७२/२, ग्रोव्ह , अ विंग, फ्लॅट क्र.१०३, वाकड, ता. मुळशी, जि. पुणे, ४११०५७

जिल्हानिहाय संपर्क :

सातारा विभाग :
श्री अवधूत वेल्हाळ (७२४९४९१२०६/८०८५८६७००७)

पुणे विभाग :
श्री. रणधीर पडवळ (९२२३३७००३९)
सौ. अर्चना औटी (७७३८०८१२०९)

सांगली विभाग :
कु. वैशाली पाटील (९३२४७२१९२३)

कोल्हापूर विभाग :
श्री गिरीश सुतार (९८२२७३७७०७)
श्री स्वप्नील शिंदे (८०८००८६१५४)

श्री स्वामी समर्थाय सकल जन हिताय..... नव्या पर्वाची अखंड सुरुवात.....
नित्यनिरंजनावधूत श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ, बोरणे - ठोसेघर, सातारा - स्वामीसेवेसाठी कृपया येथे क्लिक करा